शिंदे-ठाकरे भेटीने राजकीय चर्चेला उधाण
मुंबई click2news मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख नेत्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात असून या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे दिसून येते. मनसेनेही विधानसभा निवडणूका लढवण्याची तयारी सुरु केली असून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काही ठिकाणी मनसेचे उमेदवारही जाहिर केले आहेत. दरम्यान, आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटी मागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.