ठरलं… विजयादशमीला होणार महाविकास आघाडीचे जागा वाटप
मुंबई click2ashti बैठकांवर बैठकांचे सत्र पार पडल्यानंतर अखेर महाविकास आघाडीने जागा वाटपासाठी मुहूर्त शोधला आहे. विजयादशमीला महाविकास आघाडीचे जागा वाटप होणार असून राज्यातील २८८ पैकी २५० जागांवर आघाडीत एकमत झाल्याची माहिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपले सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून महायुती सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी मविआचे नेते सोडत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेना आिण काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या यशाने विधानसभेतही विजयासाठी आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान जागा वाटपासंबंधी आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन, तीन बैठकांचे सत्र झाले आिण विजयादशमीच्या मुहूर्तावर जागा वाटप करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.