लाडकी बहिण योजनेतील घोटाळेबाजांचे बँकखाते गोठावले
मुंबई click2ashti राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. राखी पौर्णिमेला या योजनेचे दोन हप्ते राज्यातील महिलांच्या खात्यावर जमा झाले. मात्र लाडक्या बहिणींची फसवणूक करुन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेतील 18 घोटाळेबाजांवर कारवाई करत त्यांचे बँक खाते सील केले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे अनुदानही महिलांच्या खात्यावर जमा झाले असून ितसरा हप्ताही लवकरच जमा होणार आहे. मात्र अपुरे कागदपत्रे आिण काही तांत्रिक अडचणींमुळे योजनेपासून लाडक्या बहिणी वंचित असल्याची संधी साधून योजनेत घोटाळा करुन लाखो रुपये हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड येथील एका सीएससी चालकाने योजनेत लाडक्या बहिणींच्या नावे रक्कम हडपल्याचे निदर्शनास आले. मुंबईसह राज्याभरात काही िठकाणी योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे.