व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तुळजाभवानीचे दर्शन घेऊ परतताना अपघात; दोन ठार

0

तुळजापूर click2ashti नवरात्रोत्सव सुरु असल्याने तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत निघालेल्या गाडीचा सोलापूर – सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नवरात्रात तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरुन भाविक तुळजापूरात दाखल होत आहेत. पाच मित्रही तुळजाभवानीचे दर्शना घेऊन पहाटे गावाकडे निघाले होते. मात्र सोलापूर-सांगोला महामार्गावर त्यांच्या गाडी आिण ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुखदेव बामणे (40), नैनेश कोरे (31) यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल शिवानंद (42, रा. नांदणी), सुधीर चौगुले (35 रा.वडगाव), सुरज विभुते (21 रा.कोठली) हे जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.