मुंबई महानंद दूध महासंघ संचालकपदी सौ.प्राजक्ता सुरेश धस यांची अविरोध निवड
आष्टी-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मर्या मुंबई महानंद संचालकपदी आ.सुरेश धस यांच्या सुविद्यपत्नी सौ.प्राजक्ता धस यांची अविरोध निवड झाली आहे.
महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मुंबई निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.१७ संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे.गुरुवार दि.२९ डिसेंबर अर्ज मागे घेण्याची रोजी शेवटचा दिवस असल्याने महिला राखीव मतदारसंघातून केवळ दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही ही उमेदवाराची संचालकपदी आष्टी तालुका सहकारी दुध संघाच्या संचालिका सौ.प्राजक्ता सुरेश धस व कात्रज दुध संघाच्या चेअरमन केशरबाई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे जेष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे,विरोधीपक्ष नेते अजित पवार,भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याच्या माजी मंञी पंकजा मुंडे,राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रयत्नाने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सौ.प्राजक्ता सुरेश धस यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.