आष्टीत ५१ तपस्वी यांची भव्य रथातून शोभायात्रा तर “मेहेर ज्वेलर्स” यांच्यावतीने गौतम प्रसादी वाटप
आष्टी click2ashti-शहरातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्यावतीने प.पू.अनुप्रेक्षाजी म.सा.यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त ४५ दिवस एकासना व्रत केलेल्या ५१ तपस्वी यांची सोमवारी आष्टी शहरामध्ये रथातून भव्य अशी शोभायात्रा संपन्न झाली.त्यानिमित्त मेहेर ज्वेलर्स यांच्यावतीने गौतम प्रसादी (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले होते.चातुर्मासाच्या या पवित्र काळात सामूहिक सिध्दी-तप पारणा महोत्सवाचे आयोजन आष्टी जैन श्रावक संघ यांच्या वतीने सोमवारी करण्यात आले होते.या निमित्ताने आष्टी शहरातून तपस्वीची आठ रथातून भव्यदिव्य अशी शोभायात्रा संपन्न झाली.यावेळी आष्टी शहर,राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या शोभायात्रेत महिलांनी तसेच अहील्यानगर येथील दांडिया पथकाने सर्वांचे लक्ष वेधले.याप्रसंगी झालेल्या विविध कार्यक्रमात जालना येथील संगीत रजनी दर्शीत गदिया यांचा भाव भक्ती पर गीतांचा कार्यक्रमाने आनंद भरला.यावेळी पैसठीया जाप कलश जामखेड येथील अनिल रतनलालजी मेहेर यांनी तर भक्तामर जापं कलश लाभ आष्टी येथील संजय शिंगवी यांनी घेतला. प्रभावणा लाभ सुनील रतनलाल मेहेर,वाद्य पथकाचा लाभ प्रीतम बाबुलाल कासवा,दांडिया पथक लाभ सुमतीलाल मेहेर तर रथ नियोजन संजय मेहेर यांनी केले होते.शेवटी प.पू.अनुप्रेक्षाजी म.सा.यांनी आशिर्वचन दिले.आष्टी शहरातील मेहेर ज्वेलर्सचे संचालक संतोषशेठ मेहेर आणि विजयशेठ मेहेर यांच्यावतीने उपस्थितांना गौतम प्रसादी (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोगावत यांनी केले.