आष्टी-मराठवाड्यातील स्वातंञ्य सेनानी हा इंग्रजांबरोबर तर लढलाच शिवाय निजामांबरोबरही लढला आहे.त्यामुळे मराठवाड्याच्या स्वातंञ्याला स्वातंञ्यसेनानीचे मोठे योगदान आहे.आज ह्या वास्तुचे पञकार भवनासाठी दिले असून ह्या वास्तुचे जतन पञकारांनी व्यस्थित करून आपल्या या भवनासाठी अजून जे काहि सहकार्य लागेल ते सहकार्य आपण करणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस यांनी दिली.
आष्टी शहरातील स्वातंञ्य सेनानी भवनाचे दर्पण दिनाचे औचित्यसाधत आज दि.६ जानेवारी रोजी सकाळी १२.३० वा. आष्टी तालुक्यातील पञकारांसाठी हस्तांतरीत करण्यात आले.हे पञकार भवन आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून व जेष्ठ स्वातंञ्य सेनानी बापुराव भापकर यांच्या सौजन्याने हे पञकार भवनाच्या लोकार्पणाच्यावेळेस आ.धस बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुराव भापकर,जिल्हा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष संजय मेहेर,भाजपा नेते शंकर देशमुख,आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,सभापती सुरेश वारंगुळे,सभापती शमशोद्दीन शेख,नवनीत कटारिया, विजय मेहेर,महेश चौरे,सिताराम पोकळे,अशिष लाहोटी,कपिल अग्रवाल यांच्यासह आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,आपण आष्टी शहराच्या विकासासाठी कायम कटिबध्द असून,पुढुल ५० वर्षाचा विचार करत आपण शहराचे काम करत आहोत.अजून शासन नियमाप्रमाणे आष्टी शहरातील शासनाच्या मोकळ्या असलेल्या जागा नगर पंचायतला हस्तांतरीत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.त्या जागा नगर पंचायतकडे हस्तांतरीत झाल्यावर आष्टी तालुक्यातील पञकारांना अजून मोठी जागा देऊ हे भवन आपण तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे सांगत या भवनाला दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर पञकार भवन असे दावे अशी सुचनाही आ.धस यांनी केली.या कार्यक्रमासाठी आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे,जेष्ठ पञकार सिताराम पोकळे,जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,जेष्ठ पञकार उत्तम बोडखे,भिमराव गुरव,रघुनाथ कर्डीले,शरद तळेकर,शरद रेडेकर,संतोष सानप,प्रविण पोकळे,मनोज पोकळे,नितीन कांबळे,संजय खंडागळे,गणेश दळवी यांच्यासह आदि पञकार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचालन शरद तळेकर यांनी तर आभार रघुनाथ कर्डिले यांनी मानले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.