विनोद ढोबळे,अनिरुद्ध धर्माधिकारी,अविनाश कदम यांना गंगाई-बाबाजी पञकार पुरस्कार जाहीर
शुक्रवारी होणार सन्मानीत
आष्टी-आष्टी तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद ढोबळे,दैनिक सकाळचे आष्टी तालुका प्रतिनिधी अनिरुद्ध अरविंद धर्माधिकारी व मराठवाडा साथीचे पञकार अविनाश कदम यांना राज्यस्तरीय गंगाई-बाबाजी आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून,शुक्रवारी (दि. 20) रोजी सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
आष्टी तालुका पञकार संघाच्या माध्यमातून पञकारांच्या अडीअडची सोडवून पञकारांना एकसंघ ठेवणारे विनोद ढोबळे तसेच गेल्या चौदा वर्षांपासून अनिरूध्द धर्माधिकारी यांनी दैनिक सकाळचे तालुका बातमीदार म्हणून कार्यरत असून,तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच,पीडित-वंचितांचा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी केले आहे.तर नवयुवकांना पञकारिता करण्यासाठी व तालुक्यात पञकारांची संख्या वाढवून त्यांना न्याय मिळवून देणारे आष्टी तालुका युवा पञकार संघाचे तालुकाध्य अविनाश कदम या तिन्ही पञकारांची पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ढोबळे,धर्माधिकारी व कदम यांना यावर्षीचा गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या सतरा वर्षांपासून आष्टीत गंगाई-बाबाजी महोत्सव होत असून,त्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.