व्यवहारीक ज्ञान मिळण्यासाठी या आठवडे बाजाराचा फायदा-मनिषा बांगर
आष्टी-लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले.शहरातील केंद्रीय प्राथामिक शाळा आष्टी नं.१ मध्ये यानिमित्ताने आठवडे बाजारच भरल्याचे दृश्य होते.पालकांनी विशेष महिलांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला.मुलांना व्यवहारीक ज्ञान मिळण्यासाठी या आठवडे बाजाराचा फायदा होईल असे प्रतिपादन आष्टी तहसिल कार्यालयाच्या महसूल सहाय्यक मनिषा बांगर यांनी केले.
आष्टी शहरातील केंद्रीय प्राथामिक शाळा आष्टी नं.१ येथे शनिवार दि.२१ रोजी सकाळी १० वा.आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या आठवडी बाजाराचे उद्याटन आष्टी तहसिल कार्यालयातील महसूल विभागाच्या सहाय्यक मनिषा बांगर यांच्याहस्ते करण्यात आहे.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पञकार गणेश दळवी,शाळेचे शालेय व्यावस्थापन समितीचे उपाध्यक्ष शब्बीर शेख मामु,संदिप माने,संपत धुमाळ हे होते.यावेळी बांगर बोलत होत्या.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,लहान वयातच मुलांना आर्थिक ज्ञान मिळावे म्हणून आशा बाजाराचे आयोजन करणे काळाची गरज आहे.यामधून नक्कीच विर्थ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.याशाळेमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले.यात मुले आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला,कांदे,बटाटे,हिरवी मिरची,कोथिंबिर,मटकी,गवती चहा,वांगी,पालक,मेथी,गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ,वडा-पाव,चहा,बिस्कीट,इडली-सांबार असे विविध पदार्थ घेऊन बसली होती.ते खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.या बाजाराला कन्या प्रशाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब खताळ यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार,छबुबाई दहिफळे, तायराम गळगटे,नामदेव तावरे,इला दडंवते,धनंजय कुमठेकर,बाळासाहेब तळेकर,शिला कातखडे,आबासाहेब मारकड,श्रीकांत कारांडे,मायावती नाळे,ज्योती गाडे आदि उपस्थित होते.