आज होणा-या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा-राधेश्याम धस
आष्टीत आज रंगणार पैठणीचा खेळ...
आष्टी-आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहरात पंचायत समिती प्रांगणात बुधवार दि.१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज सायंकाळी प्रसिद्ध कॉमेडी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये गप्पा गोष्टी,रंजक खेळ,हिंदी मराठी गाणे सोबत,गावराण कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत तर स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन महिलांना सन्मान चिन्हासह खास पैठणी तर ११ पैठणीसह १०० इतर बक्षिसे आणि काही रोख स्वरूपात बक्षिसे भेट देऊन सन्मानित केले जाणार आहे.या स्पर्धेत आणि कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात समाजपयोगी आणि सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाने आ.सुरेश धस यांचा वाढदिवस साजरा होत असून आष्टी येथे आज प्रसिद्ध सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर व बालगायिका व टी.व्ही स्टार सह्यादी मळेगांवकर न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा! सुप्रसिद्ध कार्यक्रम आज बुधवार दि.०१ फेब्रुवारी रोजी सायं ६ वा.तर गुरुवार दि.०२ फेब्रुवारी रोजी सायं ६ वा.प्रसिध्द युवा महिला कीर्तनकार ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांचे जाहिर हरीकीर्तन आष्टी पंचायत समिती प्रांगणात होणार आहे.या स्पर्धेत तसेच कार्यक्रमास परिसरातील महिला भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक राधेश्याम भैय्या धस मित्र परिवार यांनी केली आहे.