व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीतील खुनाच्या गुन्हातील दोन आरोपी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेला यश

0

आष्टी-आष्टी शहरातील वडार गल्लीतील राहणा-या संतोष विजय सुरवसे याने तात्या सुरवसे याला घरी बोलावून जुन्या वादातील कुरापती काढत मारहाण करत यात तात्या सुरवसे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.यातील आरोपी फरार आरोपी जेरबंद करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,पोलीस ठाणे आष्टी येथे दिनांक 06/01/2023 रोजी तात्या बबन सुरवसे यांना संतोष विजय सुरवसे व इतर 15 ते 16 जण यांनी स्वत:चे घरी बोलावुन जुन्या भांडणाची कुरापत काढुन नगर पंचायत आष्टी, निवडणुकी मध्ये आम्हाला सहकार्य का केले नाही ? असे म्हणुन लोखंडी रॉड, तलवार, दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते यातील जखमी तात्या बबन सुरवसे हा उपचारा दरम्यान अहमदनगर येथे मयत झाला.त्यावरुन दिनांक 08/01/2023 रोजी पोलीस स्टेशन,आष्टी येथे गु.र.नं.09/2023 कलम 302,307 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक,बीड यांनी गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी पो.नि.स्था.गु.शा.यांना सुचना दिल्या.त्यावरुन स्था.गु.शा.चे पथक आरोपी शोधकामी रवाना केले होते.यातील आरोपींचा जुन्नर जि.पुणे येथे शोध घेत असताना पो.नि.सो स्थागुशा,बीड यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,गुन्हयातील निष्पन आरोपी हे भिगवण जि.पुणे येथे आले आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेतले व त्यांना नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचें नाव संतोष विजय सुरवसे वय- 36 वर्ष रा.आष्टी सागर अरुण चौघुले वय-28 वर्ष रा.जुन्नर जि.पुणे असे सागिंतले वरील दोन्ही आरोपींना पो.स्टे.आष्टी येथे हजर केले आहे.गुन्हयाचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,बीडचे पो.नि.सतिष वाघ,भगतसिंग दुलत स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार सलीम शेख, मनोज वाघ,प्रसाद कदम,रामदास तादंळे,सोमनाथ गायकवाड,विकास वाघमारे,अश्विनकुमार सुरवसे,अशोक कदम यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.