स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ-प्रा.नितीन बानगुडे पाटील
आष्टी यथील शिवजंयती महोत्सवाला सुरूवात
आष्टी-राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते,असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
आष्टी येथील छ.शिवाजी महाराज शिवाजी महाराज चौक मिञमंडळाच्या वतीने शनिवार दि.१० रोजी सांयकाळी ८ वा.आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे,सुनिल दादा रेडेकर,जामगांव सरपंच शाम भैय्या धस,पांढरी सरपंच सुधीर पठाडे,खंडू दादा जाधव,मुर्शदपुर सरपंच अशोक मुळे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना प्रा.बानगुडे पाटील म्हणाले की,छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून स्वराज्य स्थापन केले.शिवरायांनी पन्नास वर्षांत एकशेदहा किल्ले बांधले मात्र कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही.नियोजन हा शिवरायांचा स्थायिभाव होता म्हणूनच त्यांनी त्यांच्या सर्वाधिक लढाया रात्रीच्या वेळी लढल्या,असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशध्यक्ष दत्ता काकडे म्हणाले की,महाराष्ट्रातील एकमेव शिवजंयती विना अध्यक्षाची साजरी होणारे आष्टी हे गाव असल्याचे सांगत या आगोदरच्या शिवजंयतीचा लेखाजोखा त्यांनी दिला.या शिवव्याख्यानासाठी शहरातील नागरीक,विशेषत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तळेकर यांनी तर आभार सुनिल रेडेकर यांनी मानले.
कारणे सांगणारे माणसं कधीच विजय होत नाहीत
छ.शिवाजी महाराजांच्या काळात कुणीच जबाबदारी झटकीत नव्हते आणि मरण्यासाठी भांडायचे आणि कोणत्याच कामाला कारण सांगत नव्हते म्हणून ते यशस्वी होतात.यामधून एकच निषपन्न होते ते म्हणजे कारणे सांगणारे माणसं कधीच यशस्वी होत नाहीत.
फक्त लढत राहा,यश मिळतेच
जिवनात जगत असतांना हार मानायची नाही.अत्यंत प्रतिकुल परिस्थिती कशी बदलायची यांचे जिवंत उदाहरण म्हणजे छ.शिवाजी महाराज होय,शुन्यातून स्वराज्य निर्माण करत ३५ हजारांच्या सैन्यांना तावडीतून ९ हजार सैन्यांनी भादभरखाॅनच्या तावडीतून एक कोटी हस्तगत केले.त्यांनी सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर नाहीतर बुध्दीच्या जोरावर जिंकल्या आहेत यातून त्यांनी फक्त लढतच राहणे म्हणजे यश नक्कीच मिळते.