व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीडच्या नव्या जिल्हाधिकारी-दिपा मुधोळ

पहिल्यांच बीडला मिळाल्या लेडी कलेक्टर

0

बीड-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेल्या वर्षापासून विशेष कामगीरी न केल्याने यांची बदली करण्यात आली असून,दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.त्या उद्या,बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत.मंगळवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढण्यात आले.
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला.त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती.तेथून औरंगाबाद येथे जीएसटी विभागात सेवा बजाविल्यानंतर त्यांनी धाराशिवच्या (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.कोरोना कालावधीत त्यांनी सलग ३७ दिवस संपूर्ण जिल्हा’ग्रीन झोन’मध्ये ठेवला होता.त्या सध्या सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.