व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा यांची कामगिरी;पूर्ण भूल न देता ट्युमर काढला

आमदार सुरेश धस यांची मोलाची साथ

0

आष्टी-अनेक वेळा मेंदूवरील शस्त्रक्रिया रुग्णाला भूल न देता करावी लागते.वैद्यक क्षेत्रात याला अवेक क्रेनिओटॉमी म्हणून ओळखले जाते.मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या महानगरांत होणा-या या शस्त्रक्रिया आता ग्रामीण भागातही होत आहेत.नगर शहरातील न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये अवेक क्रेनिओटॉमीची यशस्वी शरत्रक्रिया करण्याची कामगिरी न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा यांनी नुकतीच केली आहे.आष्टी तहसिल कार्यालयातील सेवानिवृत्त अव्वल कारकुन राजकुमार पवार यांची कन्या पायल हिच्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.
न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा यांचा अवेक क्रेनिओटॉमीमध्ये हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये एक २५ वर्षीय महिला रूग्ण आली होती. तिला सातत्याने फिट्स येत होत्या.एमआरआय तपासणीत तिच्या उजव्या मेंदूत ट्युमर असल्याचे निदान झाले.उजव्या बाजूच्या मेंदूद्वारे शरीराच्या डाव्या हातापायांचे नियंत्रण होते.अशावेळी शस्त्रक्रिया करायची म्हटले तर रुग्ण पूर्ण शुद्धीत असणे गरजेचे असते,अन्यथा सर्वसाधारणपणे मेंदूतील ट्युमरच्या शस्त्रक्रिया भूल देऊनच केल्या जातात. संबंधि महिला रुग्णाची परिस्थिती पाहता डॉ.कासवा यांनी अवेक क्रेनिओटॉमी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना याची पूर्ण कल्पना देण्यात आली.अतिशय किचकट आणि सर्जनच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ही शस्त्रक्रिया असते. डॉ.कासवा यांनी सदर महिला रुग्णाला विश्वासात घेऊन शस्त्रक्रिया सुरू केली.तिला कोणत्याही प्रकारची भूल देण्यात आली नव्हती.एकीकडे तिच्याशी संवाद साधत आणि दुसरीकडे कौशल्याने मेंदूतील ट्युमर काढण्याची कामगिरी डॉ.कासवा यांनी केली.ट्युमर काढताना मेंदूतील नियंत्रण केंद्राला धक्का पोहचणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली.ही शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी झाल्याने रुग्ण महिलेचा फीटचा त्रास कमी झाला तसेच संभाव्य पक्षाघातही टळला.या शस्त्रक्रियेबाबत डॉ. अमोल कासवा यांनी सांगितले की,मेंदूवरील शस्त्रक्रिया करताना रुग्णाला पूर्णपणे भूल दिली जाते. अवेक क्रेनि ओटॉमीमध्ये शस्त्रक्रिया करायची तेवढाच भाग बधिर केला जातो,बाकी रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर व सावध असतो.शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाशी सातत्याने बोलत होतो. तिलाही बोलते करीत होतो.कुठे काही वेगळे जाणवत आहे का, ही विचारणा करीत होतो.अखेर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली व एका रुग्णाला नवीन जीवन देता आल्याचा आंनद झाला.या शस्त्रक्रियेवेळी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ.भूषण लोहोकरे यांनी काम पाहिले. शस्त्रक्रियेचे गुंतागुंतीचे स्वरूप पाहता’इलेक्ट्रो फिजिओलॉजिकल मॉनिटरिंग साठी अहमदाबाद येथील तज्ज्ञ उपस्थित होते.न्यूरॉन प्लसचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.मुकुंद विधाते व डॉ.अविनाश गाडेकर यांनी डॉ.कासवा यांचे विशेष कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.