व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात चिमुकले,आष्टी शहरामध्ये भक्तिमय वातावरण !

फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल ची दिंडी

0

आष्टी click2ashti-आषाढी एकादशीनिमित्त आष्टी शहरातील फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल मध्ये आयोजित दिंडी सोहळ्यात चिमुकल्यांनी वारकरी संस्कृतीचा अनमोल ठेवा मोठ्या उत्साहात जपला.महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख असलेल्या दिंडी परंपरेची पुढील पिढीला ओळख व्हावी,या हेतूने संस्थेचे अध्यक्ष नागसेन कांबळे आणि प्राचार्य सिमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा शनिवार (दि.५)रोजी पार पडला.
दिंडीमध्ये इयत्ता चौथीची विद्यार्थीनी तपस्या पटेल हिने श्री विठ्ठलाची वेशभूषा केली होती,तर हिने हारिका पटेल रुक्मिणीचे रूप धारण केले.इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांची भूमिका साकारत दिंडीला शोभा आणली.डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या छोट्या मुली,हाती पताका घेतलेले झेंडेकरी आणि वीणाधारींमुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.अभंग,विठ्ठलाची आरती आणि पालखी पूजनाने दिंडीचा शुभारंभ झाला.त्यानंतर बाल वारकऱ्यांची ही दिंडी शहरातील खडकत चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनि चौक,कमानवेस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बसस्थानक,महात्मा फुले चौक,या मुख्य मार्गावरून भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली.या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मल्हारी गर्जे,संतोष पाद्रे,अब्दुल शेख,विलास कांबळे,उषा कांबळे,अफिया सय्यद, पल्लवी दाणी,स्वाती हराळ,पूजा गायकवाड,रेखा मोरे,मनीषा फुंदे,पायल रायकर,कमल शेकडे,सोनाली पठाडे,नीता चव्हाण,सागर निकाळजे,शाम बोराडे,निदा पानसरे,सरफराज सय्यद परिश्रम घेतले.चिमुकल्यांनी सादर केलेल्या या विलोभनीय दिंडीमुळे शाळेत वारकरी संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडले आणि उपस्थितांनी या प्रयत्नांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.