व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन रानडे यांची फेरनिवड

उपाध्यक्ष सागर ढोले,सचिव अशोक राऊत कोषाध्यक्ष संतोष सायकड तर खजिनदारपदी राजू करांडे यांची सर्वानुमते निवड

0

click2ashti-आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनची वार्षिक पदाधिकारी निवड बैठक नुकतीच संपन्न झाली यावर आधुनिक फोटोग्राफी तसेच विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर फोटोग्राफर संघटनेची 2025-26 या आगामी वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन रानडे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली तर कड्यातील सागर ढोले यांची उपाध्यक्ष म्हणून अशोक राऊत हे सचिव संतोष सायकड यांची कोषाध्यक्ष तर खजिनदार म्हणून राजू करांडे यांची निवड करण्यात आली.
आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी पदाधिकारी निवड करण्यात येते.शिवाय गतवर्षी घेण्यात आलेल्या विविध कार्यशाळा मार्गदर्शक शिबिरे तसेच आगामी वर्षात आधुनिक काळातील फोटोग्राफी तसेच नवनवीन संकल्पना यावर विचार विनिमय करून पदाधिकारी निवड बैठक संपन्न होते.त्याचाच एक भाग म्हणून जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त या निवडी जाहीर केल्या जातात. ज्यामध्ये आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन रानडे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली तर कड्यातील सागर ढोले यांची उपाध्यक्ष म्हणून अशोक राऊत हे सचिव संतोष सायकड यांची कोषाध्यक्ष तर खजिनदार म्हणून राजू करांडे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे तालुक्यातील सर्व फोटोग्राफर्स बांधवांनी अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.