व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भाजपाचा पहिला आमदार जरांगेच्या भेटीला;मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी बोलणार-आ.सुरेश धस

0

click2ashti-मुबंई-मराठा आरक्षण संदर्भात मुंबई आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे.या उपोषणाला भाजपाचा पहिला आमदार म्हणून सुरेश धस यांनी भेट देऊन,आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत बोलणार असल्याचे आ.धस यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी लाखो मराठा सेवकां समवेत अंतरवली ते मुंबई जात आज आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस,कॉग्रेस,शिवसेना या पक्षाच्या आमदार खासदारांनी पाठिंबा दिला.परंतु अजून भाजपाच्या कोणत्याच आमदार खासदारांनी पाठिंबा तर सोडा साधी भेट ही घेतली नाही.परंतु आज शुक्रवार दि.२९ रोजी रात्री ८.४५ वा.स्वत:आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.धसांचे संपुर्ण कुटुंब आंदोलनात
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार सुरेश धस यांनी सुरूवातीपासूनच पखठिंबा दिला आहे.दि.२७ रोजी आमदार धस यांचे बंधू देविदास धस यांनी हजेरी लाऊन सर्वांना सुरक्षित जाण्याचे आवाहन केले.आज शुक्रवारी दुपारी पुत्र जयदत्त धस ह्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.तर पुतण्या राधेश्याम धस हे आंदोलनात गावक-यांन समावेत सहभागी झाले तर त्यांचे सर्व शिलेदार देखील आंदोलकांच्या सेवेत असलेले पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.