मनुष्याला पाप-पुण्याच्या पलिकडे जाता येते-ह.भ.प.श्रीहरी पुरी
click2ashti-जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो.विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया असते,म्हणजेच कर्म हे ‘अकर्म कर्म’होते,म्हणजेच त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही.नामसंकीर्तनयोग,भक्तीयोग, ज्ञानयोग,गुरुकृपायोग अशा विविध योगमार्गांनुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाता येतेअसे प्रतिपादन ह.भ.प.श्रीहरी पुरी यांनी केले.
आष्टी येथील महाराष्ट्र सरकार ग्रुपचे अध्यक्ष सचिन लोखंडे यांचे वडील कै.मधुकर सर्जेराव लोखंडे यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने गुरूवार (दि.४)रोजी सकाळी ८ ते १० यावेळेत आष्टी येथील ह.भ.प.श्रीहरी पुरी यांचे प्रवचन संपन्न झाले.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,देविदास धस, ह.भ.प.चंद्रभान मसलेकर महाराज,सविता गोल्हार,जयदत्त धस,डॉ. शिवाजी राऊत,राजेंद्र धोंडे,अदिनाथ सानप, अमरराजे निंबाळकर, गोरख तरटे,संजय गावडे,भागचंद झांजे,पत्रकार उत्तम बोडखे,सचिन रानडे,गणेश दळवी,शरद रेडेकर यांच्यासह आष्टी तालुक्यातील राजकीय, धार्मिक,सामाजिक क्षेत्रातील व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.श्रीहरी पुरी यांनी “ठेविले अनंते तैसेची रहावे” हा संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा भाग घेतला,ज्याचा अर्थ ‘ईश्वराने आपल्याला जसे ठेवले आहे,तसेच आनंदाने राहावे’असा आहे.या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाने जी परिस्थिती निर्माण केली आहे,त्यात समाधान मानून राहावे.तसेच, संसारातील कोणत्याही गोष्टीचा उद्वेग न करता,आपल्या कर्माचे फळ भोगावे आणि सर्व भार ईश्वरावर सोपवून त्याच्या भक्तीत लीन व्हावे,असेही ह.भ.प.पुरी यांनी सांगितले