तालुक्यातील महत्वाच्या प्रकल्पाचे दोन माजी आमदारांनी दहा वर्षांत दोनच टक्के काम केले,आ.धस यांचा आरोप
click2ashti-दहा वर्षांत पाण्याचा प्रश्न दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी फक्त खुंटेफळ साठवण तलावाचे काम फक्त दोनच टक्के काम केले आहे.यावरून या दोन्ही माजी लोकप्रतिनिधीं यांनी महत्वाचा असलेल्या पाण्याचे महत्व किती होते हे मतदार संघाने पाहिले असल्याचा टोला आमदार सुरेश धस यांनी माजी आ.धोंडे,आ.आजबे यांना नाव न घेता लगावला आहे.
आष्टी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्या जन्मगाव असलेल्या चिखली गावात शनिवार दि.१३ रोजी रात्री ८ वा.श्री लक्ष्मीआई देवीचा नवपुर्ती सोहळा पेढे तुला करून पुर्ण करण्यात आला.
या नवपुर्ती सोहळ्यास उत्तर देतांना आमदार सुरेश धस बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य देविदास धस हे होते.युवानेते जयदत्त धस.नितीन मेहेर,राजेंद्र दहातोंडे,बद्रीनाथ जगताप,प्रल्हाद मुळीक,श्याम आबा तळेकर,अमोल राजे शिंदे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,तालुक्याचा महत्वाचा प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलावाचे भुसंपादन येत्या चार महिन्यांत पूर्ण करून,येणाऱ्या जुनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित या तलावाचे लोकार्पण करणार असल्याचा शब्द आ.धस यांनी दिला.तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी,माझे आजोळ आणि जन्मस्थळ असलेल्या चिखली गावातील माझ्या मामाची मुलं श्री.विलास शिंदे,श्री.रामदास शिंदे आणि चिखली ग्रामस्थांनी मी आमदार झालो पाहिजे यासाठी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी मातेला नवस बोलला होता.विधानसभा निवडणुकीत जर मी आमदार झालो तर देवीच्या मंदिरात माझी पेढे तूला करू असा नवस होता. श्री.लक्ष्मीआई देवी आणि तमाम आष्टी विधानसभेतील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो.तोच नवस फेडण्यासाठी आज समस्त ग्रामस्थ,चिखली व आ.सुरेश आण्णा धस प्रतिष्ठान यांच्या वतीने माझी पेढे तुला करण्यात आली.याशिवाय, श्री.भगवान तांबे यांनी देवीला १०१ नारळाचे तोरण बांधले,माझे स्नेही श्री.सुनिल कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांची भोजनाची व्यवस्था केली.यानिमित्ताने माझे मामाच्या गावाने फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसवून ढोल ताशे वाजवत, फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.या सर्व मामाच्या गावातील ग्रामस्थांच्या प्रेमाने मी अगदी भारावून गेलो. मामाच्या गावातील बालपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. मी लहाणापासून थोरांपर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानले.माझे लहानपणीचे सवंगडी,लहानपणीच्या आठवणी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या गावातील जेष्ठांच्या आठवणींना या वेळी उजाळा दिला.याशिवाय मोठ्या संख्येने शेतकरी आणि दूध व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांना शेळीपालन,दुग्धव्यवसाय, दुधाचे उत्पादन वाढवणे यासह प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशी गाईंचे कृत्रिम रेतन करून दुग्ध व्यवसायात प्रगतीकडे नेण्याचा माझा मानस आहे.आणि त्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.यासह शेतीकरिता जलसिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे आ.धस यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद शिंदे यांनी केले.गणेश शिंदे म्हणाले,आण्णांनी गावाला न मागताच भरपुर प्रमाणावर निधी दिला आहे.आता फक्त एक कोटी रुपायाचे लक्ष्मीआई मंदिराच्या सभागृहासाठी आणि चिखली ते पिंपळसुटी हा रस्ता द्यावा अशी मागणी गणेश शिंदे यांनी केली.या कार्यक्रमास गावातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.