गणेश दळवी आष्टी-तालुक्यातील दौलावडगांव परिसरात सोमवारी पहाटे ढगफुटी झाल्याने कडा शहरात नदीचे पाणि शिरले,यामध्ये कडा शहरातील एकाच कुटुंबातील गोविंद सापते,योगेश सापते,असराबाई सापते,मीनाबाई सापते,सुषमा सापते,आर्या सापते,काजल सापते,कृष्णा ससे,अमोल बेदरे,आकाश बेदरे,सुमन बेदरे तर शेरी खुर्द येथील महेश ढोबळे,विजय ढोबळे,प्रिती महेश ढोबळे, सुर्वणा विजय ढोबळे, राजदीप विजय ढोबळे, गायबाई रामदास ढोबळे आणि मौजे टाकळी अमिया येथील शिवाजी दगडू महानवर,शकुंतला शिवाजी महानवर,साईनाथ नवनाथ महानवर, पारूबाई दगडू महानवर,शुभांगी नवनाथ महानवर यांना तब्बल दहा तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हॅलीकॅप्टरने सुरक्षित बाहेर काढले.
इतिहासात पहिल्यांदाच कडी नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे.याचे कारण आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर वर पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी,बोरसेवाडी,आलनवाडी
या भागात रविवारी मध्यरात्री ढगफुटी झाली.व आष्टी तालुक्यातही दौलावडगांव परिसरात अतिवृष्टी झाली.परिणामी कडी नदीला पहाटेपासून पाणि वाढत चालले सकाळी ८ च्या सुमारास तर कडा शहरात पाणि घुसले,यावर सकाळ पासुनच आमदार सुरेश धस,तहसिलदार वैशाली पाटील, ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे,अनिल ढोबळे,युवराज पाटील, रमजान तांबोळी,यांच्यासह सर्व अधिकार, पदाधिकारी उपस्थित होते.येथे आल्यानंतर आमदार धस यांना तालुक्यात विविध ठिकाणी पुरामध्ये ४४ जण अडकले आहेत असे तहसिलदार यांनी सांगितले,आणि दुपारी बारा नंतर या पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी गतीने चक्रे फिरली आणि आमदार धसांनी वजन वापरून अहिल्यानगर येथील मिलेट्रीचे हॅलीकॅप्टर बोलवून ह्या पथकाने दोन वाजता आडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले घटनास्थळी दोन वाजून विस मिनीटानी पोहचले दोन चाळीसला त्यांना सुखरूप बाहेर काढले यावेळी आमदार सुरेश धस, प्रांताधिकारी वसिमा शेख,तहसिलदार यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने घटनास्थळी होते.
सुखरूप पोहचलो
पुरात आडकलेल्या एकाच कुटुबांतील ११ जणांना हॅलीकॅप्टरने सुखरूप बाहेर आणले त्यांना पहाण्यासाठी गावकरी आणि महामार्गावरील लोकांनी मोठी गर्दी केली होती,यावेळी पाण्यातून बाहेर आल्यावर गोविंद सापते,योगेश सापते, असराबाई सापते,मीनाबाई सापते यांना घेरा घातला, आमदार सुरेश धस यांनी या भांबावलेले कुटूंबाला आधार देत.पुढील उपचारासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.आण्णा तुमच्यामुळे आम्ही वाचलोत आता जिवातजीव आला म्हणत कुटुंबाने आमदार धस यांचे आभार मानत सुखरूप पोहचलो एकदाचे असे सापते म्हणत त्यांच्या चेहर्यावर आंनंद दिसत होता.