व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गावाकडच्या भूमिपुत्रांच्या कौतुक वर्षावाने पोलीस अधिकारी गहिवरतात तेव्हा

पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांच्या पदकांचा " मित्रांना " अभिमान

0

click2ashti मुंबई-पोलीस विभागामध्ये कार्यरत असताना राष्ट्रीय पातळीवर प्रतिनियुक्तीवर असताना अत्यंत मौलिक कामगिरी केल्याबद्दल २०२४ मध्ये भारत सरकारचे केंद्रिय गृहमंत्री दक्षता पदक व २०२५ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा पोलीस महासंचालकांच्या रौप्यपदक प्रदान करून अनेक प्रशस्ती पत्रास पात्र ठरलेल्या आपल्या मित्राच्या “अभिनंदनसाठी ” गेलेल्या आष्टी येथील पत्रकार बांधवांनाच्या शुभेच्छा वर्षावाने उच्चपदस्थ पोलीस अधिकारी अक्षरशः गहिवरून गेले!
त्याचे झाले असे की,मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी नियुक्तीवर असलेले आष्टी तालुक्यातील रुईनालकोलचे भूमिपुत्र बजरंग आनंदराव बनसोडे यांना नुकताच राष्ट्रीय तपास यंत्रणा महासंचालक यांच्याकडून विशेष कामगिरी बद्दल रौप्य पदक जाहीर करण्यात आले आहे.ही बाब अष्टीकरांना विशेष अभिमानास्पद आणि आनंदाची झाली.आणि म्हणून आष्टी येथील त्यांचा वर्गमित्र रघुनाथ कर्डीले हे ११ पत्रकारांसह पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन उत्स्फूर्तपणे त्यांचे कौतुक,अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.गावाकडच्या बालपणीच्या मित्र परिवारा कडून झालेले हे कौतुक अनुभवताना पोलीस विभागातील उच्च पदावर असलेल्या पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांना भावना अनावर झाल्या. अक्षरशः गहिवरून व आनंदुन त्यांनी या अत्यंत प्रेमाच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि एक तास गप्पांमध्ये मैफिल रंगली.राष्ट्रीय तपास यंत्रणा नवी दिल्ली येथे कार्यरत असताना राष्ट्रीय सुरक्षा व ऐक्य अबाधित राखण्यासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल “भारत सरकार गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४” हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.देशसेवा देशहिताला सर्वप्रथम प्राधान्य देणारी बजरंग बनसोडे यांची वृत्ती आहे.त्यांना कठीण काम सहज पूर्ण करण्यास मदत करते.याप्रसंगी तालुक्यातील महापूर,पिकांची हानी,नागरिकांचे हाल,पर्यावरण संरक्षण,पर्यावरण संरक्षण,नदी संरक्षण,संवर्धन या विषयावर त्यांनी उपयुक्त चर्चा केली.पर्यावरणाची जोपासना व पंचमहाभूतांचे महत्त्व ओळखून त्यांना जपणे आणि संवर्धन करणे हे मानवी कल्याणासाठी खूप आवश्यक आहे असेही यावेळी बनसोडे यांनी सांगितले.
विद्यार्थीदशेत बन्सोडे यांनी नवी मुंबई (पनवेल) येथे बस स्टॅन्डजवळ एका उसाच्या रसवंतीच्या दुकानावर कामगार (वेटर) म्हणून काम केले होते. त्याचवर्षी त्यांचा इयत्ता बारावीचा निकाल लागला आणि पुढील प्रगतीची वाटचाल सुरू झाली असेही त्यांनी यावेळी आवर्जून पत्रकारांशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागातील मुलांना प्रामाणिक व कठोर परिश्रम आणि शिक्षण हाच एकमेव प्रगतीचा विकासाचा मार्ग आहे.विशेषता मराठवाड्यातील दुष्काळी भागात पर्यावरण व शिक्षण यावर भिस्त ठेवूनच प्रगती करणे शक्य असल्याचेही बन्सोडे यांनी सांगितले.आष्टीचे भुमीपुत्र मुंबई पोलिस उपायुक्त बजरंग बनसोडे यांची मुंबई CP कार्यालयात आष्टी तालुका पत्रकार संघाने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.पत्रकार रघुनाथ कर्डिले यांचे वर्गमित्र असल्याने सदिच्छा भेट घेऊन गावाकडच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,उपाध्यक्ष संतोष सानप,झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डिले,भीमराव गुरव,शरद तळेकर, गणेश दळवी,सचिन रानडे,मनोज पोकळे,शरद रेडेकर, उपस्थित होते.
देशाच्या ऐक्य आणि बंधुत्वासाठी काम करता याचा अभिमान!
‘पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांच्या कौतुकास्पद कामगिरीचा अभिमान बाळगत गावाकडील वर्गमित्र आणि पत्रकार बांधवांच्या या स्नेह भेटीवेळी तुमचा आम्हाला अभिमान असून देशाच्या ऐक्य,बंधुत्व या मूल्यांसाठी आपण योगदान देता याबद्दल खूप आनंद व समाधान वाटते..’अशी भावना ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.