शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी सरकारने सरसकट मदत द्यावी,माझी एक महिन्यांची पेंशन जिल्हाधिकारी यांना देणार-भिमराव धोंडे
click2ashti-मतदार संघातील २१ महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे एक लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज असून,ज्या संपुर्ण जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये मदत दिवाळीच्या आत द्यावी तसेच माझी एक महिन्यांची पेंशन मी मदत म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले.
आष्टी येथील भगवान महाविद्यालय येथे मतदार संघाचे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांय ६.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावर्षी भयानक पाऊस झाला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर सरकारने सरसकट ज्यांच्या जमिनी पुर्ण वाहून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये अनुदान तर ज्या शेतकऱ्यांच्या विहीरी भुजल्या आहेत त्यांना पाच लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली.राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे.तसंच पशुधन वाहून घेलं असून घरांचही नुकसान झालं असल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत द्यावी तसेच पुढच्या काही दिवसात राज्यात आणखी पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात जीवित आणि वित्तहानि रोखण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी असंही धोंडे यांनी म्हटलं आहे.