विवाहितेचा हुंडाबळी;माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली लेकीची चिता
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील घटना
click2ashti-पिंपळगाव (धाबली)ता.चांदवड,जिल्हा नाशिक येथील सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या सतत छळाला कंटाळून (२२) वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली.या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी मुलीच्या सासरच्या दारातच आपल्या लेकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत आक्रोश व्यक्त केला.पोलिसांनी या प्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथील मोहिनी चंद्रकांत अहिरे (वय-२२) हिचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ केला जात होता.मोहिनीला तिच्या माहेरहून मोबाईल, गाडी आणि रोख रक्कम आणण्यासाठी मागणी केली जात होती.या मागणीवरून सासरी तिला नेहमीच शिवीगाळ आणि वादाला सामोरे जावे लागत होते.सासरच्यांच्या या छळामुळे कंटाळून मोहिनीने अखेर टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.मोहिनीच्या मृत्यूला सासरचे लोकच जबाबदार असल्याचा आरोप पीडितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची समजताच मोहिनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पिंपळगाव धाबली येथे धाव घेतली.लेकीच्या मृत्यूला सासरचे लोकच जबाबदार आहेत.यावेळी दोन्ही कुटुंबात प्रचंड वाद झाला.वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांना तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवली.पीडित कुटुंबीयांना दारात मुलीच्या मृतेदेहावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला.
या प्रकरणी मोहिनीचा पती आणि सासरच्या अन्य ५ अशा एकूण ६ जणांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तातडीने सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून,घटनेचा पुढील तपास सुरू आहे.