बिबट्यापासून संभाव्य धोका ओळखा,आफवांवर विश्वास ठेऊ नका-मंगेश साळवे
click2ashti-तालुक्यातील यापूर्वी बिबट्या सदृश्य प्राण्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे.शनिवार (दि.८)रोजी उंदरखेल परिसरात मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या दिसला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन अंभोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
यावेळी पुढे बोलतांना अंभोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे म्हणाले,सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा शेतात किंवा शिवारात एकट्याने जाऊ नका.शेतात काम करताना किंवा पाण्याच्या नाल्याजवळ एकत्रित जा.जनावरं बांधताना, गायी-म्हशींना रात्री शेतात एकटं सोडू नका.रात्री घराबाहेर किंवा शेतात जाताना टॉर्च घेऊन एकत्रित जाणे.लहान मुलांना डोंगर/टेकडी, झाडी-झूडपी अथवा नदी /नाले/ओढ्याजवळ खेळून देऊ नका.कोणालाही बिबट्या अथवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यास किंवा आवाज ऐकू आल्यास ताबडतोब अंभोरा पोलीस स्टेशन किंवा वनविभागाला कळवा.मोबाईलवर, सोशल मीडियावर अफवा पसरवू नका. सत्यता पडताळूनच खात्रीशीर माहितीच शेअर करा.तसेच
कोठेही काही अडचण असल्यास तात्काळ अंभोरा पोलीसांना सपंर्क करा असे आवाहन अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांनी केले.