व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

या तारखेपर्यंत भरा रब्बी पीक विमा…

0

click2ashti-योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) साठी ३० नोव्हेंबर, २०२५, गहु (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकाकरिता १५ डिसेंबर,उन्हाळी भात,उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता ३१ मार्च, २०२६ अशी आहे.त्यासाठीचे पीएमएफबीवाय पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.पीक विमा योजनेच्या माध्यमातून तरी नुकसान भरपाई मिळावी,अशी अपेक्षा असते.यासाठीचा प्रिमियम म्हणून शेतकरी आणि केंद्र-राज्य सरकार हा हिस्सा भरते.

पिके अधिसूचित्र;शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
रब्बी हंगाम २०२५-२६ गहू (बागायत),रब्बी ज्वारी
(बागायत व जिरायत),हरभरा,उन्हाळी भात,उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी,अधिसूचित महसूल मंडळ-क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.सदर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बैंकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे.जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे.जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत.त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग आहे.
येथे करता येणार अर्ज;पोर्टलवर करा नोंद
रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पोर्टलवर https://pmfby.gov.in स्वतःशेतकरी यांनी अथवा बैंक,विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स अॅप व सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंद करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.