उद्या सभापती प्रा.राम शिंदे,मंत्री,शिवेंद्रराजे भोसले,मंत्री,जयकुमार गोरे यांचा आष्टी दौरा
"शिवतीर्थ"येथे छ.शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा अनावरण, गृहप्रवेश,पंचायत राज संवाद मेळाव्याचे आयोजन
click2ashti-सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार दत्ताभाऊ काकडे यांच्या आष्टी शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी गृहप्रवेश आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शौर्य पराक्रम आणि प्रजाहित दक्षतेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्यमंत्री पंचायतराज संवाद मेळावा आयोजन दि.२४ नोव्हेंबर रोजी दु.१२.०५ वा.या वेळी करण्यात आले असून या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज यांचे शुभहस्ते आणि मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचे संवाद मेळाव्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य मराठवाडा भूषण आमदार सुरेश धस हे भूषवणार आहेत.या वेळीपद्मश्री,पोपट पवार,खा बजरंग सोनवणे,खा.निलेश लंके, खा.नितीन पाटील पुणे आणि मल्लिनाथ कलशेट्टी उप महासंचालक, यशदा पुणे हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमास सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी आणि हजारो सरपंच उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले आहे.