व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फिनिक्स शाळेतील विद्यार्थ्यांनीं केला बालदिनानिमित्त रेल्वेने प्रवास;बालकांमध्ये आनंद आणि उत्साह

0

आष्टी-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.आष्टी येथील फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल ने दि.१३ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळेतर्फे वर्ग पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय भेट आणि रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास आयोजित केला होता.
शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून बालकांच्या प्रतिभेला वाव देण्यात आला.या निमित्ताने शाळेत नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन,निबंध,चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी “चाचा नेहरू” यांचा आदर्श समोर ठेवून बालकांचे हक्क,शिक्षणाचे महत्त्व आणि स्वच्छतेचा संदेश शाळेचे प्राचार्य नागसेन कांबळे यांनी दिले.तसेच आज दि.१३ रोजी शाळेतील १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना न्यू-आष्टी ते अंमळनेर असा प्रवास घडवून आणत या प्रवासात विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला.त्यांनी रेल्वे तिकीट,स्टेशनवरील तिकीट तपासणी प्रक्रिया, स्टेशन मास्टर यांची भूमिका आणि रेल्वेची कार्यप्रणाली याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळवली. विद्यार्थ्यांनी स्टेशन मास्टर आणि तिकीट तपासक यांच्याशी संवाद साधून रेल्वे व्यवस्थेचा जवळून अभ्यास केला.या प्रसंगी पायल रायकर,मनीषा फुंदे,शसोनाली पठाडे,कोमल शेकडे,नेहता चव्हाण, गौरी कांबळे,मल्हारी गर्जे,श्याम बोराडे,सागर निकाळजे,राणी कोकरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत प्रवासाचा आनंद घेत उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.