वाळू माफियांची दादागिरी;महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की,शिवीगाळ करत हणामारी
आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल
click2ashti-तहसिलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सीना नदी पात्रात संगमेश्वर मंदिराजवळ हिंगणी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत आहे अशी माहिती मिळताच घटनास्थळी छापा टाकून एक पिवळ्या रंगाचा जेसीबी स्वराज कंपनीचे नंबर नसलेले तीन ट्रॅक्टर व एक ट्रॉली व घटनास्थळी ३० ब्रास वाळू एकूण ५१ लाख ३४०० किमतीचा मुद्देमाल पंचायत समक्ष जप्त करण्यात आला आहे.परंतु या वाळू माफियांनी पथकातील अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ हुज्जत घालत हनुमान करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या गुन्ह्यामध्ये पुढे नमूद आहे की तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून राजकुमार नागनाथ आचार्य तलाठी मातकुळी, प्रविण संदिपान शिंदे तलाठी चिखली,श्रीमती स्नेहल भाऊसाहेब थेटे तलाठी खडकत,योगेश पोपट गोरे तलाठी धानोरा,सुभाष शिवदास गोरे मंडळ अधिकारी, दिलीप श्रीराम गालफाडे महसुल सहाय्यक आष्टी,कुंदन चरनसिंग बावरे महसुल शिपाई आष्टी यांना सांगितले.आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,सिना नदी पात्रात संगमेश्वर मंदीराजवळ हिंगणी (ता. आष्टी) येथे अवैध गौन खनिज व वाळु उपसा होत आहे.सदर ठिकाणी छापा मारणे आहे.असा आम्हाला आदेश दिल्याने सोबत स्वत:श्रीमती वैशाली पाटील मॅडम तहसीलदार आष्टी तसेच आम्ही वर नमुद स्टाफ व पंच सुरज शांताराम कोकणे रा.तवलवाडी ता.आष्टी व धनु दत्तात्रय गावडे असे आम्ही खाजगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी खाना होवुन सांयकाळी ६.३० वा. सिना नदी पात्रात संगमेश्वर मंदीराजवळ हिंगणी ता. आष्टी येथे पोहचुन छापा मारला असता आम्हाला पाहुन तीन ट्रॅक्टरचे चालक व जेसीबी चा चालक पळुन गेले. सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.१५,००,०००/- रूपये किंमतीचा एक पिवळ्या रंगाचा विना नंबरचा JCB ज्याची किंमत १५ लाख जुना वापरता किं.अ.२५०००००/- स्वराज कंपनीची नंबर नसलेले लाल पांढऱ्या रंगाचे तीन ट्रॅक्टर धुड/हेड व एक ट्रॉली घटनास्थळी वाळु उपसा करून स्टॉक शेजारी असताना मिळुन आले किं. अं.११,०३,४००/- रूपये किंमतीची घटनास्थळी 30 ब्रास वाळु प्रति ब्रास ७३५६/-रूपये प्रमाणे व दंडासहीत ११,०३,४००/ रूपये किं. अं.
एकुण ५१,०३,४००/-रूपयेवरील वर्णनाची वाहने व मुद्देमाल नमुद पंचासमक्ष जप्त करून सदरची वाहने पुढील कार्यवाही साठी आम्ही व सोबत स्टाफ असे’तहसील कार्यालय आष्टी येथे घेवुन येत असताना जेसीबी पंच सुरज शांताराम कोकणे, एक लाल पांढऱ्या रंगाचा ट्रॅक्टर व रिकामी ट्रॉली असलेला ट्रॅक्टर पंच क्र.०२ धनु दत्तात्रय गावडे व दुसऱ्या दोन ट्रॅक्टर धुड ज्याचा रंग लाल व पांढरा स्वराज कंपनीचे एका याच्यावर तलाटी राजकुमार आचार्य व दुसऱ्या याच्यावर तलाठी प्रविण शिंदे असे सदरची वाहने आमचे पथकातील कर्मचारी घेवुन हिंगणी येथुन आष्टी येथे घेवुन येत असताना आष्टी शहरात खडकत चौकात फॉरेस्ट ऑफीस च्या कार्यालयाजवळ एक हुंडाई कंपनीची क्रेटा पांढऱ्या रंगाची गाडी नं.MH-42 BE-0776 ही गाडी जोरात आली व आमच्या सर्वात समोरील वाहन जेसीबी समोर उभी करून त्यातुन तीन लोक उतरले व ते तहसीलदार मँडम व आमच्या स्टाफ सोबत भांडण करून आम्हाला धक्का बुक्की करून शिवीगाळ करून त्यांचे वाहन आम्ही पकडलेले घेवुन जाण्याचा प्रयत्न करू लागले.त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने माझ गचुड धरून मला खाली ओडले व दुसऱ्याने पंच क्रं.१ सुरज कोकणे यांना खाली ओडले व तिसरा माणुस जेसीबी घेवुन कडाचे दिशेने निघाला असता मी जेसीबी ला आडवा झालो असता माझे अंगावर जेसीबी घालुन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माझ्या सोबतच्या लोकांनी मला बाजुला ओडले त्यानंतर त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार जिचा पासिंग नंबर माहीत नाही त्यातुन अनोळखी दोन ईसम व पांढऱ्या रंगाची बुलेरो जिचा पासिंग नंबर माहीत नाही त्यातील शुभम करडुळे व त्या सोबत ईतर अनोळखी तीन लोक आले व आमच्या वाहनांना गाड्या आडव्या लावुन आमचे ताब्यातील स्वराज कंपनीचे एक ट्रॅक्टरचे हेड ज्याच्यावर तलाठी प्रविण शिंदे बसले होते त्यांच्याशी हुज्जत व दमदाटी करून घेवुन निघुन गेले त्यांनतर आमचे ताब्यातील जेसीबी अहिल्यानगर ते आष्टी रोडवर खडकत चौकाचे पश्चिमेस मारोती मंदीराच्या जवळ मी व पथकातील कर्मचारी अशांनी पकडला व जेसीबी व तो चालविनारा महेश संभाजी आस्वर रा. वाकी यास आष्टी पोलीस स्टेशनला घेवुन आलो. विरोध करीत असताना वरील नमुद ईसमांनी संगणमत करून माझे शर्टाचे कॉलर धरून चापटाने व लाथाबक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून माझा मोबाईल क्रिटा मधील एका माणसाने हिसकावुन घेवुन गेला तसेच माझ्या सोबतचे तलाठी प्रविण शिंदे व पथकातील सहकार्यांनी एक ट्रॅक्टरचे धुड घेवुन जात असलेला नितीन विठोबा काळे याला ट्रॅक्टरचे धुड सह पोलीस स्टेशनला घेवुन आले अशा प्रकारे वरील नमुद ओळखीचे व अनोळखी ईसमांनी संगणमत करून माझ्या सोबत व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत शिवीगाळ,हुज्जत हाणमार, करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व आमच्या पथकाच्या ताब्यातील एक स्वराज कंपनीचे ट्रॅक्टरचे हेड/धुड जबरदस्तीने वरील लोक घेवुन पळुन गेले. म्हणुन माझी वरील नमुद ईसमांविरूद्ध आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत हिंगे हे करत आहेत.