व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सहा कोटी ७४,लक्ष रूपायांच्या रस्ता कामांचा आमदार धस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

0

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे, कार्यक्षम आणि विकासाभिमुख आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन विकास समितीकडून तब्बल सहा कोटी ७४ लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे.या निधीतून तालुक्यातील चार महत्वाच्या रस्ते विकास कामांना मंजुरी मिळाली असून, या सर्व कामांचा भव्य शुभारंभ आज होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना या रस्त्यांच्या उन्नतीची प्रतिक्षा होती. अपुऱ्या दळणवळण सुविधांमुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निधी मंजूर करून घेतला आहे.
मंजूर झालेली रस्ते विकास कामामध्ये
1. राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी
2. राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा–हिवरा — 1 कोटी 54 लाख रुपये निधी
3. प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी–बोरोडी — 3 कोटी 50 लाख रुपये निधी,
4. लोणी ते खुंटेफळ-वाटेफळ 1 कोटी रुपये निधी,या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ अंभोरा येथे सकाळी 10.00 वा.,नांदूर येथे सकाळी 11.00 वा.आणि पारोडी फाटा येथे 12.00 वा. या चार ही रस्ता कामांचा शुभारंभ आमदार सुरेश धस यांचे हस्ते करण्यात येणार असून ग्रामीण भागातील संपर्क वाढवणाऱ्या या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, तसेच दैनंदिन कामकाज करणाऱ्या नागरिकांना मोठी सोय असल्याने समाधान व्यक्त केले असून या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.