शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार तयार-आ.सुरेश धस
आष्टी-शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून,जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली आहे.तसेच २००७ पासून असलेली कर्ज प्रकरणी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.

आष्टी तालुक्यातील ६ कोटी ७४ लक्ष रूपाया़चे चार रस्ते कामांचा सोमवार (दि.१७)रोजी आ.सुरेश धस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ते अंभोरा येथील कार्यक्रमात बोलत होते.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,सुखदेव खकाळ,सरपंच सागर आमले,माजी सभापती अंकुश चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष रमेश गावडे,अनिल ढोबळे,अशोक इथापे,सजंय ढोबळे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,रस्ता हा दर्जेदार झाला पाहिजे अशी सर्वांनीच मागणी केली आहे.आणि त्या पध्दतीनेच हा रस्ता दर्जेदार होणार असल्याची ग्वाही आ.धस यांनी दिली.वाघळुज ते अंभोरा ह्या रस्त्याचे काम पावसामुळे दिरंगाई झाले आहे.आता लवकरच ते काम मार्गी लागणार आहे.तसेच या ठिकाणी असलेल्या पोलिस ठाणे व पोलिस वसाहत करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरी साठी असून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले,गुत्तेदारांनी हे काम कसे चांगले करील यासाठी गावकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.यामध्ये गट-तट बाजुला ठेऊन विकास कामांसाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच सागर आमले म्हणाले,गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम आमदार धस यानी मार्गी लावले पण आता संबंधित गुत्तेदारांनी हे काम चांगले दर्जाचे करावे अशी मागणी सरपंच आमले यांनी केली.कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा अभियंता सुनील राठोड यांनी केले.
तालुक्यातील पहिली वेबसाईट असलेली ग्रामपंचायत अंभोरा
सर्व कारभार ऑनलाईन पध्दतीने सुरू असून यामध्ये अंभोरा ग्रामपंचायतीचा कारभार जगात पहाता यावा यासाठी सरपंच सागर आमले यांच्या पुढाकाराने वेबसाईट सुरू करण्यात आली.त्या वेबसाईटचा शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आला.
बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश
बिहारमध्ये विरोधकांच्या सभेला असलेली गर्दी मतांमध्ये बदलली नाही.पण तर त्यांनी भाषणामध्ये वेगवेगळे शब्द वापरल्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश मिळाले असल्याचे आ.धस यांनी सांगितले.
या रस्ते कामांचा झाला आज शुभारंभ
1.राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी,
2.राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा–हिवरा — 1 कोटी 54 लाख रुपये निधी,
3.प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी–बोरोडी — 3 कोटी 50 लाख रुपये निधी,
4.लोणी ते खुंटेफळ-वाटेफळ 1 कोटी रुपये निधी,या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ आमदार धस यांच्याहस्ते करण्यात आला.