मंत्र्यांची बायको निवडणुक न लढताच नगराध्यक्ष बनली;मंत्र्याला शहराची सत्ता सुध्दा कार्यकर्त्याला देऊ नाही वाटली…!
सत्तेसाठी काहीही
click2ashti-गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजपाची सत्ता असावी यासाठी भाजपा नेत्यांनी कंबर कसली कार्यकर्ते जिवाचे रान करून भाजपाची सत्ता आणण्यासाठी जिवाचे रान करतात पण भाजपा नेत्यांना कार्यकर्ते मोठे होण्या ऐवजी आपल्याच घरात पदे घेण्याची सिस्टीमच सुरू केली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाच मंत्र्यांत ज्यांची वर्णी लागते असे मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना शहराची धुरा कार्यकर्त्यांच्या हाती न देता आपल्याच पत्नीला नगराध्यक्ष बनविल्याने नेटक-यांनी मात्र चांगलीच गिरकी घेत मंत्र्यांची बायको निवडणुक न लढताच नगराध्यक्ष बनली;मंत्र्याला शहराची सत्ता सुध्दा कार्यकर्त्याला देऊ नाही वाटली…! असा सोशल मिडीयावर ट्रोल केला आहे.

“राजकारणात टायमिंग आणि रणनीती महत्त्वाची असते,”हे भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी आपली पकड कायम ठेवत पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घडवून आणली आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने साधना महाजन यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.जामनेरमध्ये महाविकास आघाडीकडून ज्योत्स्ना विसपुते यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विसपुते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली,आणि साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.विशेष म्हणजे,या प्रक्रियेत भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटालाही धक्का दिला आहे.प्रभाग क्र.1 आणि 13 ‘ब’ मध्ये शिंदे गटाचे आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने होते.मात्र,शिंदे गटाच्या उमेदवार मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी केवळ अर्जच मागे घेतले नाहीत,तर थेट भाजपमध्ये प्रवेश केला.त्यामुळे गिरीश महाजन यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे.मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून 27 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विकासावर तसेच नेतृत्वावर येथील मतदारांनी विश्वास ठेवला, असे तेथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.