कोणतीही चौकशी लावा पण बिनबुडाचे आरोप करू नका-आ.सुरेश धस
click2ashti-राम खाडे Ram Khade यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात आपले नाव विनाकारण घेतले जात असल्याचा निषेध आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी नोंदवला आहे.या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी गैरजबाबदारपणे लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याची प्रवृत्ती अनुचित असल्याचे सांगितले.
हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना MLA आमदार धस म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार असतानाही असेच आरोप हे महाशय करत होते त्यावेळी माझ्यावर SIT मार्फत चौकशी करण्यात आली होते.मात्र सत्य लपून राहत नाही न्यायदेवतेने देखील त्यावेळी माझा कसल्याच प्रकारचा कुठेही संबंध नसल्याचे सांगितले होते.आत्ताही संबंधित राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी माझा कोणताही संबंध नाही.विनाकारण लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न योग्य नाही.या प्रकरणी जी काही चौकशी आवश्यक असेल ती संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे आणि निष्पक्षपणे करावी,असेही आ.सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.