व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सोशल मिडियातून गरळ ओकणाऱ्या मनोविकृत मनोज चौधरीवर कायदेशीर कार्यवाही करा

आ.सुरेश धस यांच्या शेकडो समर्थकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

0

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासाभिमुख आमदार सुरेश धस यांच्या समाजमाध्यमावरून होत असलेल्या बदनामीप्रकरणी मनोविकृत प्रवृत्तीचा मनोज चौधरी व इतरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,या मागणीसाठी आ.धस यांच्या शेकडो समर्थकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन संयुक्त निवेदन सादर केले.

जाहिरात

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष,नगरसेवक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती-संचालक, भाजपा पदाधिकारी,सरपंच संघटना,दूध संघ चेअरमन,प्रतिष्ठित व्यापारी अशा विविध संस्थांचे शेकडो पदाधिकारी या निवेदनात सहभागी होते.या निवेदनावर तब्बल अडीचशे ते तीनशे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की,आमदार सुरेश धस हे मराठवाडा भूषण असून गेली 35 वर्षे जनतेच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. तथापि, मनोज चौधरी हा व्यक्ती व इतर काही लोक गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर आ. धस यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा अपशब्दांनी, बदनामीकारक प्रतिक्रिया, शिवीगाळ आणि उत्तेजक भाष्य करत आहे. यामागे त्याचा उद्देश समर्थकांना भडकवून अघटीत घडवून आणण्याचा असल्याचेही निवेदनात नमूद आहे. सतत जनतेसाठी काम करणारे अशी आ.सुरेश धस यांची प्रतिमा आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून मनोज चौधरी व इतर काही लोक यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमावर आमदार सुरेश धस यांची मानहानी होईल बदनामी होईल अशा पद्धतीने मजकूर प्रसाद करून त्यांची प्रतिमा मलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज चौधरी अत्यंत मन विकृत पद्धतीने हे काम करत असून आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आणि समर्थकांसमोर जाऊन त्यांना राग येईल असा पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरील अर्वाचे भाषेमध्ये शिवीगाळ व बेताल व्यक्तव्य करत आहेत असे या निवेदनात नमूद आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड येथील कार्यक्रमादरम्यान देखील या व्यक्तीने आमदार धस यांच्या विरोधात जाहीररित्या गैरवर्तन केले व वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. अशा गंभीर प्रकाराची दखल आजवर पोलीस प्रशासनाने घेतली नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.आ.धस समर्थकांनी संयम पाळला असला तरी सातत्याने होत असलेल्या या मनोविकृत वर्तनामुळे समाजात तणाव निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करून मनोचौधरीवर तात्काळ दखलपात्र गुन्हा नोंदवून कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील असेही नमूद केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बीड येथील सभेमध्ये मनोज चौधरी यांनी केलेल्या गैरकृत्याची पोलीस विभागाने दखल घेतली आहे. आपल्या सर्वांच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या आहेत. मनोज चौधरी व इतर कोणी आक्षेपार्ह विधान करून पोष्ट करत 11असतील तर यांच्या विरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नवनीत कावत,जिल्हा पोलीस अधीक्षक बीड

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.