अखेर महेश सह.साखर कारखान्याची परवानगी पुर्ववत;माजी आमदार धोंडे यांच्या अंदोलनाला यश
click2ashti-आष्टी विधानसभा मतदार संघात कामधेनु असलेल्या महेश(कडा)सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आले होते.हे लायसन केंद्र शासनाने पूर्ववत केले आहे.हजारो ऊस उत्पादक शेतकरी,सभासद असलेला महेश सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्ष दुष्काळी परिस्थितीमुळे व पाण्याच्या टंचाईमुळे अनेक वर्ष बंद पडल्याने,राजकीय हस्तक्षेप वाढल्याने अडगळीत पडल्याने शेतकरी,कामगार,सभासद यांचे प्रचंड नुकसान झाले.
आज या मतदार संघात उजनी व इतर धरणातील अनेक योजनेतून पाणी उपलब्ध झाल्याने हजारो एकर शेतीत ऊसाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने या कारखान्याचे पुनरुज्जीवन करताना तो खाजगी न करता सहकारीच रहावा.यापुढे शेतकऱ्यांचे हित जोपासावा यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी अथक प्रयत्न केले.साखर आयुक्त,सहकार मंत्रालय व केंद्रीय सहकार मंत्रालय यांनी महेश ( कडा) सहकारी साखर कारखान्याचे लायसन रद्द केले असताना ते पुन्हा पुनर्जीवित व्हावे यासाठी लोकशाही पद्धतीने मतदार संघाचे शेतकऱ्यांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी आंदोलन करून साखर आयुक्त व राज्य सरकार,केंद्रसरकारचे लक्ष वेधले होते.माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या या लढ्याला यश आले आहे.ज्यांनी ज्यांनी या प्रकरणी माजी आ.धोंडे यांच्या सोबत खंबीर साथ दिली त्याचे आभार मानले.यापुढे या मतदार संघात शेतकरी,कामगार यांचे हित जोपासण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आ.भीमराव धोंडे हे ताकदीने काम करणार आहेत.