आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.रामदास मोराळे यांची नियुक्ती
click2ashti-आष्टी आरोग्य सेवेत प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.रामदास मोराळे यांची वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे संबंधित रुग्णालयाच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. मोराळे यांनी यापूर्वी कोव्हीड काळात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले असून,त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांची जामखेड येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून दिड वर्षांपासून काम पाहत होते.यासह विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कार्य करताना रुग्णसेवा,प्रशासन व आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.रुग्णहिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती, शिस्तबद्ध प्रशासन आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय राखून काम करण्याची त्यांची ओळख आहे.नियुक्तीनंतर बोलताना डॉ. मोराळे यांनी रुग्णांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत,तसेच रुग्णालयातील सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.त्यांच्या नियुक्तीबद्दल रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.