नगरपंचायतची मोठी कारवाई;पञे काढले,सांगाडा तसाच..!
आष्टी नगर पंचायतचा अतिक्रमण धारकांवर कारवाईचा देखावा
आष्टी-शहरातील नव्याने झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आष्टी नगर पंचायतने कंबर खसली असुन,बाजार तळातील संपूर्ण शेड उचलले तर पोस्ट आॅफिस समोरील अतिक्रमाचे टाकलेले शेड मधील पञे काढले अन् सांगाडा तसाच ठेवला यामुळे नगर पंचायत अधिकारी पदाधिका-यांनी अर्थिक व्यवहार तर केला नाही ना? अशी चर्चा शहरात सुरू आहे.
आष्टी शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोठे केले.यामध्ये ब-याच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले.काहि जणांचे पुनरवसन करण्यात आले तर काहिंना काहि दिवसात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार धस यांनी दिली.परंतु नगर पंचायत हद्दीत काहि नगर सेवकांच्या मर्जीतील अतिक्रमण धारकांना प्रोहत्साहीत करून अतिक्रमण टाकण्यास बळ देतात.यामुळे शहराचा रंग रूप पुन्हा बदलत चालल्याचे दिसत आहे.या अतिक्रमणाविषयी काहि तक्रार दात्यांनी तक्रार केली तर नगर पंचायतने मोठा आव आणत बाजार तळातील एक अतिक्रमण काढून मोठी कारवाई केल्याचा देखावा केला.परंतु पोस्ट कार्यालयासीमोर झालेल्या अतिक्रमाणाचे फक्त पञे काढून सांगाडा तसाच ठेवला त्यामुळे नगर पंचायत अधिका-यांनी या अतिक्रमण धारकांकडून अर्थपुर्ण व्यवहार करून दुर्लक्ष केले का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.याबाबत नगर पंचायतचे मुख्यधिकारी बाळदत्त मोरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क न झाल्याने बाजू कळू शकली नाही.