शिक्षण हाच आयुष्याचा खरा आधार असून स्वाभिमानानेच पुढे चला-हेमांगी कवी
आष्टी येथे आयोजित 'गंगाई–बाबाजी' कला रौप्य महोत्सव’चे शानदार उद्घाटन
click2ashti-माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिक्षण, समाजकारण व राजकारणाबरोबरच आता वैद्यकीय क्षेत्रातही भरीव कार्य सुरू केले आहे.कॅन्सर हॉस्पिटलसारखा महत्त्वाकांक्षी व समाजोपयोगी उपक्रम उभारणे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद करत गेली २५ वर्षे सातत्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करणे ही सोपी बाब नाही.शिक्षण हाच आयुष्याचा खरा आधार असून स्वाभिमानानेच पुढे चला असे प्रतिपादन हेमांगी कवी यांनी केले.

आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या २५ वर्षांपासून गंगाई-बाबाजी महोत्सव आयोजित करण्यात येतो.यावर्षी सोमवार (दि.२९)रोजी या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्याहस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे,दमयंती धोंडे,संस्थेचे सहसचिव तथा युवा नेते डॉ.अजय धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,किशोर नाना हंबर्डे,पाटोदा.कृ.उ.बा.समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,नियामतजी बेग साहेब,माजी जि.प. सदस्य सतीश शिंदे,सरपंच अशोक मुळे,ह.भ.प.दिनकर तांदळे महाराज,दिलीपराव काळे,अॅड. रत्नदीप निकाळजे,आस्ताक भाई शेख,धैर्यशील थोरवे,आण्णासाहेब भोसले,हरिभाऊ जंजिरे,शेख आज्जु भाई,पत्रकार उत्तमराव बोडखे,आदेश निमोनकर, स्वामी सानप,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना कवी म्हणाल्या,आजच्या महोत्सवात मुलींची उपस्थिती मुलांपेक्षा अधिक असल्याचे पाहून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचा विश्वास वाटतो. पुढील काळात मुली आणि मुलांमध्ये कोणतीही भीती अथवा संकोच राहणार नाही,असे ठाम मत अभिनेत्री हेमांगी कवी यांनी व्यक्त केले.यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेला हा महोत्सव आज राज्यस्तरीय ओळख निर्माण करतो आहे,ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.कला,शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविला जाईल असे त्यांनी सांगितले.