click2ashti–येथील नामवंत किराणा व्यापारी व आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक जयचंद भागचंद चोपडा यांचे आज बुधवार (दि.३१) रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने आष्टी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या सुमारे ५० वर्षांपासून आष्टी शहरातील भाजी मंडई परिसरात त्यांनी किराणा दुकानाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय केला. व्यवसायाच्या दीर्घ काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवली. त्यांच्या स्वभावातील नम्रता व मनमिळावूपणामुळे ते सर्वांच्या परिचयाचे व विश्वासाचे व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच व्यापारी, नागरिक व नातेवाईकांनी शोक व्यक्त केला.
बुधवार (दि.३१) रोजी सायंकाळी ७ वाजता आष्टी येथील बसस्थानकासमोरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जैन श्रावण संघ यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.