व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी,पाटोदा, शिरूर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) महाविद्यालय सुरू करणार-मा.आ.भीमराव धोंडे

गंगाई-बाबाजी महोत्सवाचा समारोप

0

click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर सारख्या दुष्काळी भागातील गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी,कामगारांच्या मुलांना शिक्षणाबरोबरच भविष्य काळासाठी उपयुक्त ठरणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिकविणारे महाविद्यालय आपण लवकरच सुरू करू अशी घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी,पाटोदा,शिरूर चे मा.आ.भीमराव धोंडे यांनी केली.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी, पाटोदा, शिरूर चे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयात आयोजित गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
मा.मंत्री शिवाजीराव पंडित,सौ.दमयंती धोंडे,प्रा.सुशीला मोराळे, डॉ.अजय धोंडे,मा.आ.राजेंद्र जगताप,सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,बाबशेठ भंडारी,विजय कोठारी,सुभाष सारडा,साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,राजू धोंडे,ह.भ.प.दिनकर महाराज तांदळे,मा.सभापती नियमत बेग,अशोक देशमुख,रिपाइंचे चे जिल्हाध्यक्ष अशोक साळवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ.भीमराव धोंडे पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची अजूनही गरज आहे. बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये अजूनही निरक्षर लोकांचे प्रमाण काही अंशी शिल्लक आहे. आपण सुरू केलेल्या शाळा, महाविद्यालयाचा उपयोग इथल्या ग्रामीण भागातील लोकांना झाला. आपल्या भागातील ऊस तोडणी कामगारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविणे हे लोकप्रतिनिधी समोर मोठे आव्हान आहे.
साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर लिखाण केले पाहिजे. शेतकऱ्यांचा उद्धार शिकलेल्या लोकांनी केला पाहिजे.विशेषता पी.एच.डी. मिळवलेल्या प्राध्यापकांनी वेगवेगळ्या विषयावर मातृभाषेतून पुस्तके लिहिली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. २००० साली भगवान महाविद्यालयाच्या एका हॉलमध्ये सुरू केलेला गंगाई बाबाजी महोत्सव रोप्य महोत्सवी वर्षात येऊन पोहोचला आणि त्याचे एका वेलीचे रूपांतर वटवृक्षात झाले.त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.आपल्या मनोगतातून आईची आठवण काढताच आ.धोंडे गहिवरले.
मा.मंत्री शिवाजीराव पंडित यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, की,आष्टी,पाटोदा,शिरूरचे मा. आ.भीमराव धोंडे यांनी मला त्यांच्या आई-वडिलांच्या नावाने दिला जाणारा गंगाई बाबाजी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यामुळे मला मोठा आनंद झाला.धोंडे साहेबांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे.त्यांच्या या उपक्रमाचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो.मात्र सध्या समाजात जे काही चालले आहे ते लोकशाही पद्धतीने चालले का हुकूमशाही पद्धतीने चालले ? ते जनतेने ठरवावे आपल्या हातून भविष्यकाळातील आदर्श पिढ्या घडाव्यात अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी प्रा.सुशीलाताई मोराळे,प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर, दत्ता काकडे,डॉ.विलास सोनवणे,प्राचार्य सतीश चंद्र सूर्यवंशी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी धार्मिक, शिक्षण, कृषी, वैद्यकीय, क्रीडा,उद्योग,साहित्य,प्रशासन,कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.ज्ञानदेव वैद्य,प्रा.बाळासाहेब खेमनर,प्रा.सुरेश फुले, प्रा. श्रीकांत धोंडे यांनी सूत्रसंचालन केल. उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.