कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची इच्छा;मात्र डाव वेगळा असल्याचा आरोप
click2ashti-कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा, ही इच्छा आमचीही आहे.मात्र माजी आमदार धोंडे साहेबांचा खरा डाव वेगळाच असून त्यांना या कारखान्याची मौल्यवान जमीन हडप करायची असल्याचा गंभीर आरोप कामगार पुत्र प्रताप थोरवे यांनी केला आहे.
कडा साखर कारखानातील कर्मचारी थकीत वेतन मागणीसाठी सर्व कर्मचारी नियोजन बैठक शुक्रवार (दि.२)रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कामगार पुत्र प्रताप बाळासाहेब थोरवे बोलत होते.
पुढे बोलतांना थोरवे यांनी सांगितले की,कारखाना सुरू करण्याच्या नावाखाली दिशाभूल केली जात असून प्रत्यक्षात कारखान्याच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्यात आला आहे.याशिवाय या कारखान्यासाठी आवश्यक असलेला निधी सर्व नियम धाब्यावर बसवून महेश मल्टीस्टेट पतसंस्थेकडून उभारण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
कारखान्याच्या व्यवहारात पारदर्शकता नसून,कामगारांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणीही प्रताप थोरवे यांनी यावेळी केली.दरम्यान,या आरोपांबाबत धोंडे साहेब किंवा संबंधित संस्थांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.