“उत्तोमत्तम”अंक प्रकाशनासाठी उपस्थित राहा-विनोद ढोबळे
गौरव ३५ वर्षाच्या पञकारितेचा अन् सोहळा आष्टी तालुका पञकार संघाचा
आष्टी-आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे गौरव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा दि.१० मार्च २०२३ शुक्रवारी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे.हितचिंतक,मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आष्टी तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद ढोबळे यांनी केले.
या गौरव विशेषांकाचे प्रकाशन आदर्शमाता श्रीमती रंगुबाई लक्ष्मणराव बोडखे यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे ,माजी आ.साहेबराव दरेकर यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, मुर्शदपूरचे सरपंच अशोक मुळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे आणि विविध मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.हा गौरव विशेषांक प्रकाशन सोहळा आष्टी पंचायत समिती सभागृहात संपन्न होणार आहे.विविध क्षेत्रातील मित्रपरिवार जेष्ठ नागरिक बंधूभगिनी,पत्रकार तसेच गुंणीजन मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुप्रभात ग्रुप व सत्कार संयोजन समिती,आष्टी तालुका पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.