व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा-कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन

0

आष्टी-भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जितका मोलाचा वाटा क्रांतिकारकांचा आहे,तितकाच महत्त्वाचा वाटा वृत्तपत्रांनी निभावला आहे.ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करण्याचे,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि स्वातंत्र्याची ज्योत जनसामान्यांच्या मनात तेवत ठेवण्याचे कार्य वृत्तपत्रांनी केले,असे प्रतिपादन कवी व साहित्यिक प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.
आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त मंगळवार (दि. ६) रोजी दुपारी १२.३० वाजता पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.समाजातील सत्य,शोषण,अन्याय आणि जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे काम पत्रकारांनी सातत्याने केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप,बंदी, संपादकांवर कारवाई, तुरुंगवास अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. तरीही अनेक पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून सत्य मांडले. आजच्या काळातही पत्रकारांनी मूल्यनिष्ठ, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारिता जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करत दर्पण दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी उपाध्यक्ष संतोष सानप,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे,उत्तम बोडखे,दत्ताभाऊ काकडे,भीमराव गुरव,रघुनाथ कर्डिले,शरद तळेकर,प्रा.डॉ.विनोद ढोबळे,मनोज पोकळे,सचिन रानडे,गणेश दळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तळेकर व आभार आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे यांनी मानले.दर्पण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.