आष्टी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सानप, कार्याध्यक्षपदी भीमराव गुरव यांची बिनविरोध निवड
click2ashti-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या निवडी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी,कार्यक्षम व पत्रकार संघाच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे दै.लोकाशाचे तालुका प्रतिनिधी संतोष सानप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच कार्याध्यक्षपदी भीमराव गुरव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
दर्पण दिनानिमित्त मंगळवार (दि.६) रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार भवन येथे आष्टी तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक पार पडली. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे व प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले आणि संघाच्या कायम हिताचा विचार करणारे संतोष सानप यांच्या कार्याची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत
उपाध्यक्ष-मनोज पोकळे,शरद रेडेकर
सचिव-विनोद ढोबळे
कार्याध्यक्ष-भीमराव गुरव
यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व पत्रकारितेतील मूल्ये जपण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, उत्तम बोडखे, दत्ताभाऊ काकडे,प्रविण पोकळे,रघुनाथ कर्डिले,शरद तळेकर,सचिन रानडे,गणेश दळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्या नेतृत्वाखाली आष्टी तालुका पत्रकार संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.