व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी ग्रामीण रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भपिशी शस्त्रक्रियेची ऐतिहासिक सुरुवात

0

click2ahti- ग्रामीण रुग्णालयात आता आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला असून,दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) गर्भाशयातील पिशवीचे निदान व शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.या सुविधेअंतर्गत पहिल्या रुग्णावर बुधवार,
(दि.७) रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली,अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे यांनी दिली.

आष्टी ग्रामीण रुग्णालयात येथून पुढे टप्प्याटप्प्याने सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा सुरू करण्यात येणार असून, तालुक्यात पहिल्यांदाच ग्रामीण रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भाशयातील पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.या शस्त्रक्रियेचा लाभ तालुक्यातील ब्रम्हगाव येथील आशा पिंगळे(वय ४० वर्षे)या महिलेला झाला.सदर शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे व स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रकाश आघाव यांनी यशस्वीपणे पार पाडली.यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
ग्रामीण महिलांसाठी मोठा दिलासा
या अत्याधुनिक सुविधेमुळे आता ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या शहरात किंवा खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, तसेच आर्थिक खर्चातही मोठी बचत होणार आहे.आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या या यशामुळे तालुक्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.