click2ashti-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून,या घटनेवर आमदार सुरेश धस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.आपल्या शोकसंदेशात आ.धस म्हणाले की,“उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्याने मन हेलावून गेले आहे.शोक व्यक्त करताना शब्द अपुरे पडत आहेत.महाराष्ट्राच्या दृष्टीने आजची सकाळ अत्यंत दुर्दैवी ठरली आहे.”
शोक व्यक्त करतांना आ.धस पुढे म्हणाले,“स्वभावाने अजितदादा जरी थोडे फटकळ वाटत असले,तरी मनाने ते अत्यंत निर्मळ,पारदर्शक आणि प्रामाणिक होते.त्यांच्या बोलण्यात कधी कधी कठोरपणा जाणवत असे, शमात्र ज्या व्यक्तीशी ते फटकळपणे बोलत,त्याच व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याचे काम करून देणे,हा त्यांचा खरा स्वभाव होता.”आपला व्यक्तिगत संबंध अधोरेखित करताना आ. धस म्हणाले, “मी दादांच्या अत्यंत जवळ होतो. त्यांना अतिशय जवळून पाहिले आणि समजून घेतले. त्यामुळेच त्यांचा हा अचानक आणि दुर्दैवी अपघात स्वप्नातही न पाहिलेला, मोठा धक्का देणारा आहे.”काम,नेतृत्व आणि माणुसकीच्या प्रत्येक क्षेत्रात ‘दादा’म्हणून ओळखला जाणारा नेता आज अचानक आपल्यातून निघून गेला, ही बाब अत्यंत वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शेवटी आ.सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत,“त्यांच्या आठवणी आणि त्यांनी जपलेली मूल्ये सदैव प्रेरणा देत राहतील,”असे नमूद केले.
आष्टीकरांनी व्यवसाय बंद ठेऊन वाहिली श्रध्दांजली
राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निधनाने जिल्ह्यासह महाराष्ट्राचे कधीही भरून येणारे नुकसान झाले आहे.स्व.अजित दादा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात व्यापाऱ्यांच्या वतीने अर्पण करण्यात आली.यावेळी सागर धस,गणेश शिंदे, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे, सुनिल रेडेकर,रंगनाथ धोंडे,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,सुभाष बोंदार्डे,
प्रितम बोगावत,सुरेश पवार यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर व्यापारपेठ बंद असल्याने शहरात शुकशुकाट दिसत होता.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.