व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या;लोकभवन येथे शपथविधी

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार विराजमान

0

click2ashti-मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तथा राज्यसभा खासदार खा. सुनेत्रा अजित पवार यांचा शपथविधी सोहळा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील लोकभवन येथे पार पडला. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला, तर या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार व खासदार उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या निवडीला मंजुरी दिली.सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. तरीही त्यांचा राजकीय प्रवास थांबला नाही.18 जून 2024 रोजी त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या असून, तेव्हापासून त्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सक्रिय भूमिका बजावत आहेत.अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवी दिशा मिळेल,असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.