व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दुःखाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला आमदार सुरेश धस यांचा वाढदिवस;एका दिवसात मच्छिंद्रनाथ गटांसाठी १ कोटी ३३ लाखांची देणगी जमा

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर नाथभक्तीचा जागर

0

click2ahti- आष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली व दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर नाथभक्त माजी मंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस यांनी आपला ५६ वा वाढदिवस कोणताही जल्लोष,हारतुरे किंवा कार्यक्रम न करता अत्यंत साधेपणाने श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर साजरा केला.
श्री मच्छिंद्रनाथ बडे बाबांच्या सानिध्यात त्यांनी समर्थक,कार्यकर्ते व भाविकांच्या शब्दरूपी शुभेच्छा स्वीकारल्या.या प्रसंगी आमदार सुरेश धस यांनी शाल,श्रीफळ,फेटा किंवा कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत, “भाविकांची सदिच्छा व आशिर्वाद हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे,”अशी भूमिका मांडली. वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिक,कार्यकर्ते व भाविकांनी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील गाभाऱ्याच्या बांधकामासाठी यथाशक्ती देणगी अर्पण करून आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या दीर्घायुष्याची व यशस्वी कार्याची कामना केली.गाभारा बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी जमा या साध्या पण अर्थपूर्ण उपक्रमातून १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी जमा झाला असून हा निधी श्री मच्छिंद्रनाथ गडावरील गाभारा बांधकाम व इतर विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे.परिसरातील गावोगावातून देणगीचा ओघ सातत्याने सुरू असून नाथभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत आहे.

आमदार सुरेश धस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण पोकळे, संपादक गणेश दळवी,पत्रकार सचिन रानडे दिसत आहेत.

———————————————
पत्रकार संघाची सदिच्छा भेट
यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आमदार सुरेश धस यांची श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.पत्रकारांशी संवाद साधताना आमदार धस म्हणाले,“श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील विकासकामांची वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे. लाखो नाथभक्तांनी श्रद्धेने दान दिले असून मदतनिधीचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.”
विघ्नसंतोषी बदनामीवर चिंता व्यक्त
याचवेळी त्यांनी काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.बालाघाट परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये घडणाऱ्या अपघाती घटनांचा संबंध गडाशी जोडून चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गडावर सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर, सकारात्मक व वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचवावी,असे आवाहनही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केले.
कलाकुसरीच्या कामाबद्दल समाधान
पत्रकारांनी मंदिराच्या गाभाऱ्याच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता, अत्यंत सुबक व दर्जेदार कलाकुसरीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. नाथभक्त व सेवक या नात्याने आमदार सुरेश धस हे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून भाविकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.समाजहितासाठी संवेदनशील व संयतपणे कार्य करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या कार्याचे नाथ संप्रदायातच नव्हे तर राज्य व देशपातळीवरून कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,सभापती राम शिंदे,राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील,भाजपा प्रदेश सरचिटणीस नवनाथ पडळकर,सुजितसिंह ठाकूर,खासदार निलेश लंके,आमदार महेश लांडगे,विक्रम पाचपुते,प्रशांत ठाकूर,नारायण कुचे,राहुल ढिकले,मोनिका राजळे, नितेश राणे,भीमराव तापकीर,माजी आमदार भीमराव धोंडे, ओमप्रकाश शेटे,नंदकिशोर मुंदडा,धनंजय देशमुख आदींनी दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
३५७ रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्त रक्तदान
आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा न करता समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३५७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.