व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अबब…!कंत्राटदार-अधिका-यांनी डांबरीकरणाचा एक थरच टाकला खाऊन

कारवाईसाठी चार गावच्या ग्रामस्थांचा कडा-गहिनीनाथगड रस्त्यावर रास्ता रोको

0

आष्टी–या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खिसेभरू वृत्तीचा आणखी एक नमुना आष्टी तालुक्यात समोर आला आहे.तालुक्यात सन २०१६-१७ साली करण्यात आलेल्या कडा ते केरूळ-बीडसांगवी-गहिनीनाथगड (चिखली) या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, या रस्ता कामात समाविष्ट असलेला बीडसांगवी घाट ते भवरवाडी दरम्यान १० किलोमीटर अंतरावर डांबरीकरणाचा एका थराचे काम न करता निधी हडप करण्यात आल्याचा आरोप करीत कंत्राटदार-अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस युवानेते अशोक पोकळे यांच्या पुढाकाराने किन्ही, बीडसांगवी,भवरवाडी, येताळवाडी या चार गावच्या ग्रामस्थांसह सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सन २०१६-१७ या वर्षांमध्ये कडा ते केरूळ-बीडसांगवी-गहिनीनाथगड (चिखली) या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला होता.मात्र,रस्ता कामातील बीडसांगवी येथील घाटापासून भवरवाडी या अंतरावरील डांबरीकरणाच्या एका थराचे कामच करण्यात आले नाही. त्यामुळे या भागात रस्त्यावर अल्पावधीतच खड्डे पडून अपघातांचे प्रमाण वाढून तीन ते चार जणांना प्राणास मुकावे लागले तर अनेकांना जायबंदी व्हावे लागले.अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण करावे या गेल्या चार वर्षांपासूनच्या परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र,बांधकाम विभागातील अधिका-यांनी दाद दिली नाही अगर कोणतीही माहिती न देता कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.कहर म्हणजे रस्त्याचे अर्धवट काम झाले असताना पूर्ण देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करून बांधकाम विभागाने सन २०१८ साली पुन्हा या रस्त्यावरील १० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाच्या थराची निविदा काढली.मात्र,तरीदेखील ही काम पूर्ण झाले नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अशोक पोकळे यांनी शासकीय निधीचा अपहार करणा-या कंत्राटदार व बांधकाम विभागातील तत्कालिन अधिका-यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे झोपेतून जागे झालेल्या बांधकाम विभागातील अधिका-यांनी तातडीने रस्त्याच्या रखडलेल्या कामास सुरवात केली.मात्र,संबंधित कंत्राटदार व अधिका-यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कडा-गहिनीनाथगड रस्त्यावर किन्ही गावाजवळ आज श्री.अशोक पोकळे यांनी किन्ही,बीडसांगवी,भवरवाडी,येताळवाडी या गावांतील शेकडो ग्रामस्थांसह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गासह आष्टी ते डोईठाण रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अधिका-यांनी आंदोलनस्थळी यातील सत्यता पडताळून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या वेळी अशोक पोकळे यांच्यासह सरपंच भरत भवर, उपसरपंच अशोक इंगोले,चिंचाळा सरपंच पंडित पोकळे,युवा नेते प्रवीण काकडे,संतोष काकडे,अशोक आप्पा पोकळे,संतोष मोरे,संतोष भवर, गणेश मोरे,ओंकार मोरे,विजय काकडे,सरपंच संजय काकडे,सुदर्शन काकडे,विक्रम काकडे,अशोक काकडे महाराज,कृष्णा पोकळे,सागर पोकळे,दिनेश काकडे,दादासाहेब पोकळे,बाळू पोकळे,देविदास वनवे फौजी,महादेव पालवे,पिंटू ढोबळे,संजय चौधरी,बाळासाहेब पिसाळ, उद्धव खिलारे,महेंद्र काकडे,बजरंग तरटे,शिवाजी भवर,गणेश पोकळे, महादेव भवर,बंडू पोकळे,गोकुळ नरोडे,पवन काकडे,सौरभ काकडे, अक्षय काकडे,योगेश काकडे,रोहित निंबाळकर,भाऊसाहेब पवार, बाळू पोकळे,अविनाश पारखे,ताराचंद कानडे,चंदू कानडे,राजू नरोडे,लक्ष्मण करांडे,कृष्णा करांडे,शिवाजी करांडे,रोहित नरोडे,अमोल करांडे,प्रशांत घुमरे,सागर घुले,प्रमोद करांडे,लहू कराडे,अक्षय मोरे,सुनील घुले,मनोज गंगे,माऊली चव्हाण,विठ्ठल जाधव,अमोल अजय मोरे,लक्ष्मण करांडे,कृष्णा करांडे,शिवाजी करांडे,रोहित नरोडे,अमोल करांडे,प्रशांत घुमरे,सागर घुले,प्रमोद करांडे,लहू करांडे,अक्षय मोरे,सुनील घुले,मनोज गंगे,माऊली चव्हाण,विठ्ठल जाधव,अमोल अजय मोरे,बाबू करांडे, सोमीनाथ करडुळे,मारुती करडुळे,अमोल करडुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कामाची चौकशी करा-अशोक पोकळे
कडा ते गहिनीनाथगड रस्त्याचे काम अर्धवट करून संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांनी संगनमताने निधी हडप केला आहे. वास्तविक रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम होऊन डांबरीकरण केल्यानंतरच संपूर्ण देयक अदा करण्यात येते. मात्र,या अर्धवट कामाचे संपूर्ण देयक काम अर्धवट असताना कंत्राटदारास कसे अदा करण्यात आले याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
-अशोक पोकळे, जिल्हा सरचिटणी, राष्ट्रवादी कॅंग्रेस पाटी
आंदोलनाचा इशारा देताच आली जाग
दरम्यान, सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामापैकी अर्धवट ठेवण्यात आलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा केला. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या बांधकाम विभागाने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. अशोक पोकळे यांनी चार गावांतील ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच झोपेतून खडबडून जागा होत अर्धवट ठेवण्यात आलेले रस्त्याचे हे काम तातडीने सुरू करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.