व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फंडातील रूपाया शिल्लक ठेवणार नाही-आ.आजबे

0

आष्टी-आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या आमदार फंडातून मतदारसंघातील आवश्यक असणाऱ्या ठिकाणी,गावागावात विविध विकास कामे पूर्ण केली असून यावर्षीही जवळपास चार कोटी रुपयांचे विकास कामे पूर्णत्वाकडे आहेत.मागील कोरोना काळामध्ये राज्य शासनाच्या वतीने आमदार फंड हा कमी देण्यात आला होता.परंतु यावर्षी आमदार फंडातून मतदार संघातील विविध विकास कामे करण्यात आला असून,राज्य शासनाकडून मिळत असलेल्या चार कोटी विकास निधी हा विविध विकास कामावर खर्च करण्यात आला असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगीतले.
गेल्या तीन वर्षात विशेष म्हणजे करोना काळातसुध्दा आपण आमदार फंडातील सर्व निधी खर्च केला.परंतु मध्यतंरी आपण मतदार संघातील खर्च करण्यास पिछाडीवर असल्याचे बातम्या प्रसिध्द केल्या.यावर आमदार आजबे आज दि.७ रोजी प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे सांगतीले.पुढे बोलतांना ते म्हणाले, आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील विविध विकास कामे आमदार फंड व वेगवेगळ्या निधीमधून मोठ्या प्रमाणावर पूर्ण केले आहेत.तर काही ठिकाणी अनेक कामे सुरू आहेत.मतदारसंघात होत असलेल्या विकास कामामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नुसते आमदार फंडावरच अवलंबून राहता इतर हेडमधूनही व वेगवेगळ्या विभागाअंतर्गत निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न आपण तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे केली असल्याचे आम्ही नाही तर मतदार संघातील जनताच सांगेल.
रूपड्या शिल्लक ठेवला नाही
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासाठी दरवर्षी मिळणाऱ्या चार कोटी विकास निधी मधून आपण आतापर्यंत एकही रुपया शिल्लक ठेवला नाही संपूर्ण निधी मागणी होईल.त्या पद्धतीने विकास कामावर खर्च करण्यात आला आहे.आमदार निधी हा मार्च अखेरपर्यंत खर्च करायचा असतो,परंतु काही वर्तमानपत्रात आमदार बाळासाहेब आजबे यांनी कमी आमदार निधी खर्च केला अशा बातम्या आल्या परंतु अनेक कामे प्रस्तावित असून त्याच्या प्रशासकीय मान्यता ही झालेले आहेत.त्यामुळे मार्च अखेरपर्यंत एकही रुपया शिल्लक राहणार नाही, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा बातम्या प्रसिध्द करणे योग्य नसल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.