व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.धस यांच्या प्रयत्नातून रस्तांसाठी ७५ कोटी तर आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून रेल्वे उड्डाण पुलासाठी ५० कोटी मंजूर

0

आष्टी-आष्टी विधानसभा मतदारसंघातील रस्ता कामांसाठी आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये आणि आ.राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून कडा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत.मार्च २०२३ या अर्थसंकल्पीय कामांमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रस्ता कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.मंजूर करण्यात आलेली कामे खालील प्रमाणे आष्टी तालुकापाटोदा तालुक्यातील रा.मा.क्र.५६ ते महासांगवी रस्ता सुधारणा करणे १.०० कोटी रु. शिरूर कासार तालुक्यातीलपिंपळनेर ते वडगाव रस्ता सुधारणा करणे १.०० कोटी रु,रा.मा.क्र.५९ ते विघनवाडी रस्ता सुधारणा करणे १.००कोटी रु. याप्रमाणे आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातील रस्ता कामांना आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये तर आष्टी तालुक्यातील भूमिपुत्र असलेले माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नाने कडा ते धामणगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी सतत होणारे अपघात लक्षात घेऊन त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधकाम मंजूर करण्यात आले आहे.या ठिकाणी भूसंपादनासह ५० कोटी रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत.अशी माहिती आ.सुरेश धस यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वीय साहाय्यक विनोद रोडे यांनी दिली आहे.या मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामांमुळे आष्टी मतदार संघातील अनेक गावातील शेतकरी व्यापारी नागरिक यांच्या दळणवळणाची चांगली सोय होणार असल्यामुळे जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.